सिल्लोड, (प्रतिनिधी): मोटारसायकलवर सिल्लोडकडून सारोळा गावी जाणाऱ्या दुचाकी स्वाराला पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रक चालकाने जोराची धडक दिली.
या अपघातात दुचाकी स्वार युवक जागीच ठार झाला. हा अपघात जळगाव छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर स्वस्तिक लॉन जवळ रविवारी दुपारी २. ४५ वाजेच्या सुमारास झाला.
अक्षय मोठेबा वराडे (वय २७, वर्ष रा. सारोळा) असे जागीच ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. अक्षय हा त्यांची मोटरसायकल क्रमांक एमएच २० ईव्ही ६०४२ वर बसून छत्रपती संभाजीनगर जळगाव हायवे रोडने सिल्लोड कडून सारोळा त्यांच्या गावाकडे जात असताना पाठी मागून भरधाव येणाऱ्या -
आयशर (ट्रक क्रमांक एमएच २० इजी ५५८४) च्या चालकाचा वाहनवरील ताबा सुटल्याने त्याने मोटारसायकल स्वारास पाठीमागून जोराची धडक दिली.
या अपघातात अक्षय जागीच ठार झाला. अपघात करून ट्रक चालक पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी मयतास सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र तेथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. शोकाकुल वतावरणात रात्री उशीरा सारोळा येथे त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले त्या ट्रक चालकाचा पोलीस शोध घेत आहे. या घटनेचा तपास पोहेकॉ सचिन काळे करत आहे.















